राफेल प्रकरणात आण्णा हजारे यांची उडी 

नगर: भारत सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल विमान करारामध्ये घोटाळा केल्याचे आरोप झाल्यापासून केंद्रीय राजकारण चांगलेच रंगु लागले आहे. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली  विरोधीपक्षांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणत आरोप होत आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा राफेल प्रकरणात उडी मारली असून, मी हवेत बोलणार नाही. ‘मात्र राफेल प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून राफेलचे सत्य जनतेसमोर मांडेन’ अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली.
येत्या ३० जानेवारीपासून आण्णा हजारे, लोकपाल कायद्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे.यावेळी आण्णा हजारे मोदी सरकार विरोधात हि टीका करणार असून, सरकारने लोकपाल कायद्याची मलबजावणी केली नाही. मात्र संसदेत एक बिल आणून लोकपालला आणखी कमकुवत केले आहे. आणि मोदी सरकार देशाला हुकूमशाहीकडे घेऊन जात आहे. अशी टीका आण्णा हजारे यांनी केली.मात्र सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी मी येत्या ३० जानेवारीला आंदोलनाला सुरवात करणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)