राफेल प्रकरणाची सत्यता बाहेर येईलच

पृथ्वीराज चव्हाण : स्वायत्त संस्थांवर मोदी यांचे आक्रमण

पुणे – राफेल विमान खरेदी प्रकरणातील कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू असून, काही दिवसांतच त्याच्या खरेदीच्या घोटाळ्याची सत्यता बाहेर येईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार हे माजी आमदार, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

भाजपचे माजी मंत्री अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेलच्या चौकशीची मागणी सीबीआयकडे केली होती. त्या प्रकरणात सीबीआय तक्रार दाखल करणार याची कुणकुण पंतप्रधानांना लागली आणि त्यांनी सीबीआय प्रमुखांनाच सक्तीच्या रजेवर पाठवले. त्यानंतर कार्यालयांना सील करून कागदपत्रे लपवली. सरकारला कोणती भीती वाटत होती, की त्यांनी हे कृत्य केले, असा सवाल चव्हाण यांनी विचारला आहे.

राफेल खरेदी फ्रान्सकडून झाली आहे. त्यामुळे भारतातून जरी याची माहिती मिळाली नाही, तरी फ्रान्सकडून ती नक्कीच मिळेल. त्यासंदर्भातील कागदपत्रे मिळवली जात असून, लवकरच या घोटाळ्यातील सत्यता बाहेर येईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.

नोटाबंदीच्या निर्णयाबाबतही मंत्रिमंडळाशी चर्चा केली नाही. तर थेट त्यांना निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही याविषयी माहिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अविचारी निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती धोक्‍यात आली असून, अशा निर्णयांमुळे आर्थिक भूकंप होईल, असे चव्हाण म्हणाले.

केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीआय, सीव्हीसी, सर्वोच्च न्यायालय, रिझर्व बॅंक या सगळ्या स्वायत्त संस्थांवरही मोदी यांनी आक्रमण केले आहे. 19 नोव्हेंबरला रिझर्व बॅंकेची बोर्ड बैठक होणार असून त्यातील निर्णयाची प्रतिक्षा असल्याचे, चव्हाण म्हणाले.

नोटबंदीमुळे विविध क्षेत्रात झालेल्या परिणामांचा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)