राफेल नदालला विक्रमी 11वे विजेतेपद

 मॉंटो कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा

मॉंटो कार्लो  – जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदालने मॉंटो कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आपली हुकमत पुन्हा एकदा दाखवून देताना तब्बल 11 व्या वेळी या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अनपेक्षितरीत्या एकतर्फी ठरलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्याने जपानच्या केई निशिकोरीचा 6-3, 6-2 असा सहज पराभव केला.

राफेल नदालने अंतिम सामन्यात निशिकोरीवर पहिल्याच सर्व्हिसपासून वर्चस्व गाजविले. पहिल्या सेटनंतरच नदाल  निशिकोरीवर  दडपण आणण्यात यशस्वी ठरला होता. त्यामुळे जागतिक मानांकनात 22व्या स्थानी असलेल्या निशिकोरीला नदालसमोर जास्त काळ टिकाव धरता आला नाही. स्पर्धेत खराब सुरुवात झाल्यानंतर चांगली कामगिरी करत पुनरागमन करणाऱ्या निशिकोरीने अंतिम सामन्यातही त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यावेळी अपयशाला सामोरे जावे लागले.

निशिकोरी अंतिम सामन्यात इतका थकलेला दिसत होता की, सामना संपायला अकरा मिनिटे बाकी असताना तो ही लढत पूर्ण करु शकेल असे दिसत नव्हते.
त्याआधी सामन्याच्या सुरुवातीला नदालने सर्व्हिसची चूक करत डबल फॉल्ट केला होता. यावेळी निशिकोरीने त्याच्यावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्याला ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. त्यानेही नदालप्रमाणे डबल फॉल्ट करत ही आघाडी गमावली. आक्रमक सुरुवात करणाऱ्या निशिकोरीला नंतर केलेल्या चुका महागात पडल्याने त्याने सामना 6-3, 6-2 असा गमावला.

या स्पर्धेतील विजेतेपदाबरोबर नदालने मास्टर्स विजेतेपदाचाही विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याचबरोबर त्याने क्‍ले कोर्टवर लागोपाठ 36वा विजय नोंदवला आहे. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या बार्सिलोना ओपन विजेतेपदावर त्याचे लक्ष असेल. त्याने ही स्पर्धाही दहा वेळा जिंकली आहे. त्याचबरोबर त्याला जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक टिकवण्यासाठी बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकणेही महत्त्वाचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)