राफेल डील : पंतप्रधान मोदींचा अंबानीसोबत सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक

राहुल यांची टीका 

नवी दिल्ली – राफेल करारावरून भारताचे राजकारण तापत असतानाच फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे विरोधकांना हाती आयते कोलीतच मिळाले आहे. या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता मोदी सरकारला ट्विटरवरून सातत्याने घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

-Ads-

राहुल गांधी यांनी म्हंटले आहे कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी मिळून देशाच्या सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मोदींनी आपल्या देशाच्या शहिदांच्या बलिदानाचा अपमान केला आहे, या शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.

दरम्यान, याआधीही राहुल यांनी ट्‌विटरवरून ओलांद यांचे आभार मानत दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी मोदींनी खटाटोप केल्याचे उघड झाल्याचे म्हटले आहे. मोदींनी व्यक्तिश: राफेल करारासाठी वाटाघाटी केल्या. त्यांनी बंद दाराआड करारात बदल केला. देशाशी विश्‍वासघात करतानाच मोदींनी भारतीय जवानांच्या बलिदानाची अप्रतिष्ठा केली, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)