राफेल चौकशीसाठी संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी – नवाब मलिक

मुंबई – फ्रान्सच्या राफेल विमान खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त संसंदीय समितीची स्थापना करावी. त्यातून विमानांच्या किमती का वाढल्या, एचएएल या कंपनीचे कंत्राट का रद्द केले याचा खुलासा व्हावा. बोफोर्स प्रकरणात तात्कालीन विरोधकांनी जसा खुलासा मागितला गेला होता तसा खुलासा सरकारने राफेल प्रकरणात करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

राफेल विमान खरेदीचा करार ज्या पद्धतीने झाला त्यात अनेक शंका उपस्थित होत आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी जसे अडचणीत आले तसे फ्रान्स देशातही राजकीय पेच व राजकीय समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्या देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी राफेल विमान निर्मिती करणा-या दसॉल्ट कंपनीला धमकावल्याचा आरोपही त्यांनी केला.

-Ads-

पंतप्रधान आयुष्यमान योजनेची प्रसिद्धी झाली, परंतु ती राबविणारी यंत्रणा कोठे आहे, असा सवाल करताना राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले. परंतु त्यात लाभ मिळणा-या कुटुंबांची संख्या 1 कोटी 20 लाखांनी कमी का झाली, याकडे मलिक यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीतील राफेलबाबतच्या विधानाचा विपर्यास एका वाहिनीने केला. त्याला चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम सदर वाहिनी करत आहे. तसेच वेब पोर्टल आणि सोशल मीडियावर चुकीचे वृत्त पसरविले जात आहे. कॉंग्रेसपेक्षा निर्णय घेणाऱ्यांची (राफेलबाबत) विश्वासार्हता कमी झाली असल्याचे पवार म्हणाले होते. त्यांनी मोदी यांना क्‍लिन चीट दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)