राफेल घोटाळा प्रकरण: राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आणि दुर्दैवी- अनिल अंबानी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लाभासाठीच राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा केला असल्याच्या आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.

तसेच, ज्याने आयुष्यात कधीही विमान बनवले नाही त्याला विमाने तयार करण्याचे कंत्राट देऊन मोदींनी त्यांच्यावर मेहरबानी केली. कारण अनिल अंबानी हे सध्या कर्जबाजारी आहेत त्यांच्यावर 45 हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. असे राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, अनिल अंबानी यांनी पहिल्यांदाच राफेल प्रकरणावर प्रतिक्रया दिली आहे. “राहुल गांधी यांचे आरोप बनबुडाचे आणि दुर्दैवी असून विजय सत्याचाच होईल” असे आंबानी यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेसकडे चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती आहे. जी द्वेष, स्वार्थ हेतू प्रतिस्पर्धी भावनेने प्रेरित आहे. असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)