राफेल घोटाळा प्रकरणात कोर्टातही दाद मागणार – सिब्बल 

इंदोर: राफेल विमान खरेदीत मोदी सरकारने जो घोटाळा केला आहे त्यातील काहीं कागदपत्रे आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत ती हाती आल्यानंतर आम्ही या प्रकरणात कोर्टातही दाद मागणार आहोत, अशी माहिती ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की हा एक मोठा घोटाळा असून यातील अनेक प्रश्‍नांची उत्तरे, देण्यास मोदी सरकार असमर्थ ठरले आहे.
विमान खरेदी प्रकरणातील सारी नियमावली बाजूला सारून ही विमाने खरेदी करण्यात आल्याचे ते म्हणाले. या खरेदीची कल्पना संरक्षण मंत्री किंवा विदेश मंत्र्यांनाही देण्यात आली नाही. ते म्हणाले की या विमानांची खरेदी किंमत मोदी सरकारने लपवण्याचे कारण नाही. खरेदी िंकंमत जाहीर केल्याने सुरक्षा व्यवस्थेला काही अडचण येईल असे वाटत नाही असेही ते म्हणाले. राफेलला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे लोक बोफोर्सचा उल्लेख करीत असले तरी बोफोर्स प्रकरणात काहीही निष्पन्न झाले नाही. उलट ज्यांच्यावर संशय होता त्यांनाही कोर्टाने निर्दोष सोडले.
आता राफेल प्रकरणात ते कसे निर्दोष सुटतात ते आम्ही पाहू असा टोमणाही त्यांनी मारला. रॉबर्ट वढेरांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संबंधात विचारले असता ते म्हणाले की देशात आता लोकसभा निवडणुकीचा काऊंटडाऊन सुरू झाले आहे त्यामुळे अशी प्रकरणे अपेक्षितच आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)