राफेल इफेक्‍ट : सरकारने फेटाळली अदाणींची भागीदारी

नवी दिल्ली – भारतीय लष्करासाठी रशियाकडून 3 हजार कोटी रूपयांची एके-103 ऍसॉल्ट राफयली खरेदी करण्याचा करार केंद्र सरकारने केला आहे. या रायफलींचे भारतात संयुक्त उत्पादन करण्यासाठी अदाणी उद्योग सुमहाला भागीदार करण्यास अनुमती द्या अशी मागणी रशियाकडून करण्यात आली होती. परंतु मोदी सरकारने त्यांची ही मागणी अमान्य केली आहे.

सध्या राफेलच्या गैरव्यवहारावरून सरकारविरोधात कॉंग्रेसने जोरदार प्रचार चालवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. अदाणी उद्योग समुह हा मोदींशी निकटचा असलेला समुह मानला जातो.

हा दोन सरकारमधील करार आहे. त्यानुसार रशियाकडून भारताला या रायफली दिल्या जाणार आहेत. पण त्याची भारतात निर्मीती करण्यासाठी त्यांना पार्टनर हवा होता. त्यासाठी रशियाने अदाणी उद्योग समुहाची भारत सरकारकडे शिफारस केली होती. परंतु गेल्या महिन्यात केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळल्याचे सांगण्यात येते. तंत्रज्ञान निर्यातीसह रशियाने हा प्रस्ताव दिला होता.

तथापी संरक्षण मंत्रालयाने हा प्रस्ताव नाकारताना म्हटले आहे की हा सरकार ते सरकार असा करार असल्याने त्यांना त्यांचा भारतातातील खासगी भागीदार निवडता येणार नाही कारण त्यात त्या भागीदाराला तंत्राज्ञानही पुरववावे लागेल. ते योग्य ठरणार नाही असे कारण देत केंद्र सरकारने हा प्रस्ताव अमान्य केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)