राफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब

नवी दिल्ली: राफेल विमान घोटाळा प्रकरणात आज राज्यसभेत कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध झाले. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकुब करावे लागले. आता सोमवारी या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होईल.

राफेल प्रकरणात कॉंग्रेसने या आधीच तहकुबी सुचना दिली आहे. तशातच आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाचाहीं निकाल आला आहे त्यामुळे आज सभागृहात कॉंग्रेस बरोबरच भाजपच्या सदस्यांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीतच अरूण जेटली यांनी सुचना केली की कॉंग्रेसने या प्रकरणी चर्चेची मागणी केली आहे त्यानुसार सभागृहात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यानुसार हा विषय चर्चेला घेण्यात यावा.

समाजवादी पक्ष आणि अद्रमुक या पक्षांनीही आपआपल्यामागण्या लावून धरत घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळात भरच पडली. समाजवादी पक्षाने बुलंदशहर दंगली प्रकरणात चौकशीची मागणी करीत तर अद्रमुकने कावेरी विषयावरून घोषणाबाजी केली. कॉंग्रेसचे सदस्य राफेल प्रकरणात जेपीसी चौकशीची मागणी करीत होते तर भाजपचे सदस्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून राहुल गांधी यांच्या माफीची मागणी करीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)