राफेलची चौकशी करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची अशीच गत होईल : राहुल गांधी

file photo
देश आणि संविधान धोक्‍यात 
नवी दिल्ली: सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा यांनी राफेल गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे काम हाती घेतल्यानेच चौकीदाराने त्यांची उचलबांगडी केली असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही केला आहे. या संबंधात आज एका ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, सीबीआय प्रमुख अलोक वर्मा राफेल घोटाळा प्रकरणाची कादगपत्र एकत्र करण्याचे काम करीत होते. त्यांना जबरदस्तीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या कृतीतून पंतप्रधानांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे. जो कोणी राफेल विषयाच्या आसपास फिरकेल त्याची अशीच गत होईल. त्याला हटवले जाईल आणि मिटवले जाईल. देश आणि घटना दोन्ही सध्या धोक्‍यात आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राजस्थानातील झालावाड येथे झालेल्या एका जाहीरसभेतही राहुल गांधी यांनी हा विषय उपस्थित करताना थेट मोदींवर आरोप केले.काल रात्री देशाच्या चौकीदाराने सीबीआय प्रमुखांना त्यांच्या पदावरून हटवले कारण त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी राफेल गैरव्यवहाराच्या चौकशीचे काम सुरू केले होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव आणि आयपीएलचा फरारी कमिशनर ललित मोदी यांच्यात आर्थिक व्यवहार होते असा आरोपहीं त्यांनी केला. ललित मोदींनी वसुंधरा राजेंच्या मुलाला कोट्यवधी रूपये दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)