रानजाईचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे निधन

पुणे – पुण्यातील रानजाई या पर्यावरणवादी संस्थेचे संस्थापक चंद्रसेन बोऱ्हाडे यांचे आज, रविवारी सकाळी ह्दयक्रिया बंद पडून निधन झाले ते 65 वर्षांचे होते. पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून ते ख्यातनाम होते. पुणे महालिकेच्या वृक्षसंवर्धन प्राधिकरणाचे ते माजी सदस्य होते. राज्य सरकारच्या पुणे जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राज्य सरकारने त्यांचा दलित मित्र म्हणून पुरस्कार देऊनही गौरव केला होता.

बोऱ्हाडे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणविषयक अनेक उपक्रम राबवले. शहराच्या मुठा नदीत प्रक्रिया न करता दूषित पाणी सोडले जाते याविषयीचा एक शास्त्रीय अहवाल तयार करून तो राज्य सरकारला व प्रदुषण मंडळालाही पाठवला होता. पुण्याच्या हवाप्रदुषणाचे वेळोवेळी नमूने घेऊन त्यावरचेही अनेक अहवाल त्यांनी सादर केले आहेत. ग्रामीण भागात पर्यावरण समृद्धीचे प्रकल्प, शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती, शहर वाहतूक पोलिसांची वेळोवेळी आरोग्य तपासणी असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले.

आज वैंकुठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख भगवानराव वैराट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कसबा विभागाचे नेते विजय खराडे अदिंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)