राधिका रोडवर पाणी गळतीने लाखो लिटर पाणी वाया

सातारा – राधिका टॉकीज ते सातारा एस्टी स्टॅन्ड रोडवरील तीन ठिकाणी पाणी गळती सुरु आहे. यात लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे. या ठिकाणचे अनेक दिवस पाणी वाया जात असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कोणत्याही स्वरूपात उपाययोजना अद्याप केली नसल्याने. या वाया जाणाऱ्या पाण्याची किंमत कोणाला नाही का असा प्रश्‍न उपस्थत होत आहे.

एकीकडे जल है, तो कल है, म्हणत राज्य सरकारच्या अनेक उपयोजना कार्यक्रम सुरु दिसतात. त्यामध्ये जलयुक्त शिवार, वॉटर कप सारख्या स्पर्धांना ग्रामीण भागात जलसंधारणाला चालना मिळाली. मात्र शहरात पाणी बचतीचे महत्व रुजवण्याचा शासनाकडून कोणताच प्रयोग केला नसल्याने गावात पाण्या बाबत जागृती झाली नाही. यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी बचतीचा संदेश तसेच जनजागृती गांभीरपणे करणे आवश्‍यक बनले आहे.

एकीकडे गावांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शहरात पाणी वाया घालवले जात आहे. या बेपर्वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणी जाब विचारणार का असा सवाल आज सातारकर नागरिक विचारत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कारभाराच्या व्यवस्थापनात ढिलाई आहे. तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला अनुशासनाला कठोर अधिकारी नियुक्त करणे आवश्‍यक बनले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)