राधिका रोडवर गळती काढण्याचे काम सुरु

सातारा – राधिका टॉकीज ते सातारा एस्टी स्टॅण्ड रोडवरील तीन ठिकाणी सुरु असलेल्या पाणी गळतीचे सचित्र वृत्त दै. प्रभात ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेउन पाणी गळती काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
या परिसरातील व्यवसायिक तसेच नागरिकांना रोजच या वाया जाणाऱ्या पाण्याकडे पाहून वाईट तसेच नवल देखील वाटत होते.आता शहतील, गोडोली, राधिका रोड, मोनार्क हॉटेल, महाराजा हॉटेलची मागील बाजू अशा
ठिकाणी पाणी गळती काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने सुरुवात झाली आहे.

नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी जरी विलंब लागला असला तरी त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता गायकवाड यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत. शहरातील रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या खोदकामांमुळे गळत्यांचे प्रमाणही वाढत आहे. वारंवार पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला गळती लागण्याच्या प्रकारामुळे शहरातील नागरिकही हैराण झाले आहेत. गळती लागल्यानंतर तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असतात.

यामुळे शहरातील नागरिकांवर कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते, पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मोर्चे काढावे लागतात. दरम्यान, गळतीप्रकरणी दैनिक प्रभात वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागा झालेल्या विभागाने तात्काळ गळती काढण्याचा कामाला सुरुवात केली आहे. प्राधिकरणाने गळती काढण्याच्या कामाला सुरुवात केल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून दैनिक प्रभातचेदेखील आभार मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)