सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणणार का ?

छोट्या पडद्यावरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस येत आहे. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पाहिला . उद्योजिका बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिसही चालू केले . मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

राधिका आता तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे. त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनीमध्ये 50% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय करतो आणि यात किती तो यशस्वी होतो? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)