राधिका आपटे हॉलिवूडपटात झळकणार

प्रियांका चोप्रासारखेच आता मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ही हॉलिवूडसृष्टीत आपले पाऊल टाकत आहे. लवकरच ती एका हॉलिवूडपटात झळकणार असण्याचे तिने ट्विट केले आहे. दुसऱ्या महायुद्धावर आधारित चित्रपटात राधिका इतर दोन अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
स्पष्ट आणि सडेतोड मत मांडणारी अभिनेत्री राधिका आपटेने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिच्या भूमिकेबद्दल नेहमीच कौतुक केले जाते. राधिकाने चित्रपटाबरोबरच लघुपट, वेब सिरीजमध्येही काम केले आहे. दुसऱ्या महायुद्धावर आधारलेल्या चित्रपटात राधिका महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

भारतीय वंशाच्या गुप्तहेर राजकन्येच्या भूमिकेत राधिका झळकणार आहे. नूर इनायत खान हे पात्र ती साकारणार आहे. टीपू सुलतान यांच्या वंश असलेल्या नूर इनायत खान या ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या गुप्त सेनेचा भाग होत्या. या चित्रपटाचे नाव अद्यापही जाहीर केलेले नाही. स्टेना कॅटिक, सारा मेगन थॉमस या अभिनेत्री राधिकासोबत दिसणार आहे.

-Ads-

चित्रपटांबरोबर राधिका सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करते. काही दिवसांपूर्वीच बिकिनी फोटोवरून ट्रोल झालेल्या राधिकाचा पुन्हा एकदा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला आहे. यावेळेस तिने स्विमिंग पूलच्या बाजूला उभा असलेला तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिने शेअर करताच केवळ एका दिवसाच्या आत त्यास दोन लाखांपेक्षा अधिक लाइक्‍स मिळाल्या आहेत. राधिकाचे चाहते या फोटोवरून तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी राधिकाने शेअर केलेल्या एका बिकिनी फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले होते. परंतु या फोटोला मात्र यूजर्सकडून पसंत केले जात आहे. या फोटोमध्ये राधिका नॅचरल ब्यूटी लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळेच राधिकाने हा फोटो शेअर करताच त्यास यूजर्सकडून सातत्याने कॉमेण्ट्‌स येत आहेत. कोणी “हॉट’ तर कोणी तिच्या नॅचरल सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)