‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिका नव्या वळणावर

कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये राधा आणि प्रेम यांच्यात सगळे सुरळीत सुरू होते. राधाने प्रेमचा व्यवसाय चालविण्यास मदत करणे, त्याच्यासोबत ऑफिसला जाणे, राधाचा प्रेमला पुरेपूर आधार मिळत होता. प्रेमच्या मनामध्येदेखील तिने स्वत:ची हक्काची अशी जागा बनवली. परंतु हे सगळे मात्र दीपिकाची आई देवयानीला रुचले नव्हते. तिने राधा आणि प्रेमच्या विरोधात खूप मोठे कारस्थान रचले आणि त्यामध्ये ती यशस्वीदेखील झाली. देवयानीने राधाच्या भोळ्या स्वभावाला लक्षात घेऊन तिला विषप्राशन करण्यास प्रवृत्त केले. आणि प्रेमच्या प्रेमाखातर हे करण्यास राधा तयारदेखील झाली. राधा आता प्रेमच्या आयुष्यात नाही म्हणजेच आपल्या आयुष्यात नाही याची कल्पनादेखील प्रेमला नाहीये.

देवयानीने प्रेमला पूर्णत: आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आहे. संपूर्ण कुटुंबाला तिने बंगलोरमध्ये विपश्चना सेंटरमध्ये आहे असे सांगितले आहे. यावर सगळ्यांचा विश्वासदेखील बसला आहे. इन्सपेक्टर राजेदेखील देवयानीची साथ देत असून त्याने प्रेमला खोटे सांगितले की, राधा सेंटरमध्ये सुरक्षित आहे. पण प्रेमला सत्य कधी कळणार? प्रेमसमोर देवयानीचा खरा चेहरा आला तर? दीपिकाचे आयुष्य सावरण्यासाठी देवयानीने राधाला मारून टाकले हे सत्य आता फक्त आदित्यला कळाले असून, आता पुढे मालिकेमध्ये काय होणार? हे जाणून घेणे खूपच रंजक असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)