राधानगरी, सागरेश्‍वर अभयारण्य दोन दिवस बंद 

कोल्हापूर – जंगलाच्या हद्दीत पर्यटनाच्या नावाखाली पार्ट्या होण्याची शक्‍यता गृहीत धरून 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी राधानगरी आणि सागरेश्‍वर अभयारण्य बंद ठेवण्यात येणार आहे. विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) विजय खेडकर यांनी ही माहिती दिली.

राज्यभरातून तसेच अन्य विविध राज्यांमधून अभयारण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यामुळे 31 डिसेंबर व 1 जानेवारीच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटकांकडून अथवा अन्य व्यक्‍तींकडून जंगल हद्दीमध्ये पर्यटनाच्या नावाखाली पार्ट्या होण्याची शक्‍यता आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी या दोन दिवशी अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचे वनपरीक्षेत्रामधील परिमंड, नियतक्षेत्रामध्ये कार्यरत राहावे. तसेच जंगल हद्दीमध्ये पर्यटनाच्या नावाखाली अथवा अन्य व्यक्‍तींकडून पार्टीचे आयोजन होणार नाही. याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा घटना निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी दोन दिवस अभयारण्यास भेट देण्याचे टाळावे, असे आवाहनही खेडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)