रात्री, पहाटे गार वारा ; दिवसा मात्र घामाच्या धारा

 पुण्याने पार केली तापमानाची चाळिशी

पुणे – मागील दोन दिवसांपासून शहरातील उन्हाचा कडाका पुन्हा वाढला आहे. सूर्यनारायण चांगलेच तापल्यामुळे दिवसभर अंगाची लाही-लाही होत आहे. तर रात्रीही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मंगळवारी (दि. 24) शहरातील कमाल तापमानाने 40 चा आकडा ओलांडला असून, लोहगाव येथे 41.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाचा चटका काहीसा कमी होईल, असे वाटत असताना मागील दोन ते तीन दिवसांपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका नकोसा होत आहे. दुपारच्यावेळी नागरिक घर किंवा कार्यालयाच्या बाहेर पडणे टाळत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळही कमी पहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरातील आकाश निरभ्र राहिल, तर कमाल तापमानात किंचीतशी वाढ होण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मराठवाडा, विदर्भ तापला
गेल्या 24 तासांत राज्यातही तापमानात वाढ झाली असून, विदर्भ आणि मराठवाडा चांगला तापला आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात किंचीत वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. मंगळवारी (दि. 24) परभणी येथे सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहिल. 25 ते 26 एप्रिल दरम्यान विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर 28 एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज (दि. 24) दिवसभरातील राज्यातील काही शहरांमधील कमाल तापमान

परभणी 44.1, चंद्रपूर 43.9, ब्रह्मपुरी 43.7, अकोला 43.3, वर्धा 43.2, नांदेड 43, जळगाव 42.9, यवतमाळ 42.5, सोलापूर 42.1, मालेगाव आणि बीड 42, अहमदनगर, वाशिम आणि नागपूर 41.8, अमरावती 41.6, लोहगाव 41.2, गोंदिया 41.1, उस्मानाबाद 41, बुलढाणा 40.6, सांगली 40.4, सातारा 40.1, पुणे आणि औरंगाबाद 40.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)