पुणे: रात्रीच कापल्या सीसीटीव्हीच्या केबल

सिग्नल लागला, आणि…

नसरवान पेट्रोल पंपाचे मालक नाशीर शेख आहेत. त्यांचे शहरात मध्यवर्ती भागात तीन पेट्रोल पंप आहेत. ते महिन्यातून एकदा येथे पाहणीसाठी येतात. पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन गजानन पवार व राजस रणपिसे करतात. बॅंकेची रोकड मालकाच्या वॅगन-आर कारमधून दररोज नेली जाते. या कारवर बर्नाड हा चालक मागील वीस वर्षांपासून काम करतो. रोकड नेताना बर्नाट व एक कर्मचारी कारमध्ये असतो. तर त्यांच्या मागे दुचाकीवर व्यवस्थापक पवार हे असतात. त्यांचा दररोजचा मार्ग ठरलेला असतो. आजही ते नेहमीप्रमाणे रोकड घेऊन चालले होते. यावेळी पवार हे त्यांच्या कारच्या मागे दुचाकीवर होते. बिबवेवाडी चौकात कारने सिग्नल पार करताच सिग्नल लागला. मात्र पवार हे सिग्नल लागल्याने थांबले. यानंतर हिरवा सिग्नल लागल्यावर ते कारला गाठण्यासाठी दुचाकीवरुन चालले होते. मात्र लाईट हाऊस इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे त्यांनी तेथे थांबून बघितले असता. त्यांना पेट्रोलपंपाची कार दिसली. यामुळे ते गर्दीतून पुढे गेल्यावर त्यांना रोकड लुटल्याची घटना कळाली.

पुणे – पुणे-सातारा या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर व चौकात मागील 20 वर्षांपासून नसरवान पेट्रोल पंप आहे.येथील रोकड कधी व केव्हा नेण्यात येते, यावर पाळत ठेऊन लुटमारीचा गुन्हा केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीच्या केबल आदल्या रात्रीच कापल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपावर रात्री सुरक्षारक्षकही असतो. यामुळे पेट्रोल पंप चालकांनाही सीसीटीव्ही केबल काबल्याचा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे हीच कार्यपध्दती राबवत दत्तनगर येथील बेलदरे पेट्रोल पंपाची 20 लाखांची रोकड चार महिन्यांपूर्वी चोरण्यात आली होती. यावेळी बॅग हिसकावताना प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले होते. हा कर्मचारी तेव्हा गंभीर जखमी झाला होता.

पोलिसांनी काळजी घेण्याची केली होती सूचना
या पेट्रोलपंपावर जवळील पोलीस स्टेशनचे कर्मचारी नेहमी पेट्रोल भरण्यासाठी येतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाला “रोकड नेताना काळजी घ्या, इतकी जुनी कार का वापरता’ अशी सूचनाही केली होती. या पेट्रोल पंपाची रोकड पूर्वी एटीएमची रोकड घेऊन जाणाऱ्या एजन्सीमार्फत बॅंगेत भरली जात होती. मात्र, त्यांच्या गाडी येण्याची वेळ व यांची रोकड जमा होण्याची वेळ यात तफावत असल्याने वर्षभरातच एजन्सीला काम थांबवण्यात सांगण्यात आले होते. यानंतर पेट्रोल पंपाचे कर्मचारीच मागील काही वर्षापासून स्वत: रोकड बॅंकेत भरतात. बॅंकेच्या मॅनेजरने कार चालकाला अनेकदा दर वेळेस वेगवेगळ्या मार्गाने जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तो नेहमीच्याच मार्गाने जात होता. यातच पेट्रोल पंपाने रोकडेचा विमाही काढलेला नाही.

दोन लुटींमध्ये साम्य
चार महिन्यापूर्वी दत्तनगर येथील बेलदरे पेट्रोल पंपाची 20 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. यावेळी चोरट्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोलभरुन दुचाकीवरुन रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग केला होता. यानंतर पुढच्याच चौकात कर्मचाऱ्याच्या कोयत्याचा धाक दाखवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्याने प्रतिकार केल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर चोरटे दुचाकी दरीपुलावर सोडून पसार झाले. या पेट्रोल पंपाची रोकडही बॅंका बंद असल्याने दोन दिवसांची जमा झाली होती. ही रोकडही सोमवारीच लुटण्यात आली होती. या घटनेतील गुन्हेगार सीसीटीव्हीत कैद झाले होते. मात्र त्यांचा अजूनही माग लागलेला नाही. दोन्ही घटनांतील कार्यपध्दती एकसारखीच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)