रात्रगस्तीसाठी भाजपकडून मुंबई अधिनियमाची आठवण

सावेडी उपमंडलाचे निवेदन : घरफोड्या, चोरी व दरोडे रोखण्यात पोलिसांना अपयश

नगर: शहराच्या सावेडी उपनगरात चोरी, घरफोड्या, खून, धूमस्टाईलने मंगळसूत्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तोफखाना पोलिसांना या चोऱ्या रोखण्यात अपयश येत आहेत. पोलिसांची रात्रगस्त नियमानुसार होत नसून, गस्तीसाठी असलेले मुंबई अधिनियमच पोलिसांनी धाब्यावर बसविला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या सावेडी उपनगर मंडल कार्यालयाने केला आहे. पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात भाजपचे सावेडी उपमंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व सरचिटणीस मुकुल गंधे यांनी हे निवेदन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सावेडी उपनगरात उच्चभ्रू वसाहतींबरोबर नोकरदार रहिवाशी अधिक आहेत. सावेडी उपनगर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचबरोबर चोरी, घरफोड्या, खून, धूमस्टाईलने मंगळसूत्र चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. यातून सावेडी उपनगराची कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. तोफखाना पोलिसांनी रात्रगस्त नियोजित वेळेत होत नसल्याने चोरी आणि घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. सावेडीत गस्तपथक आणि दामिनीपथकाची गस्तच बंद झाल्याचे दिसते आहे. सावेडीतील सुरक्षितेसाठी भाजपने 15 सप्टेंबर 2017 निवेदन देत लक्ष वेधले होते. त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

दोन वर्षापूर्वी दिलेल्या निवेदनानंतरचा आढावा घेतल्यास सावेडीत चोरी, घरफोड्यांचा आकडा शेकडोच्या घरात असल्याचे दिसतो. आता तर भरदिवसा देखील घरफोड्या सुरू झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या घरी चोरी किंवा घरफोडी झाल्यास, त्याचे वर्षाचे उत्पन्न चोरीला जाते. त्यामुळे सावेडीतील नागरिकांना सुरक्षिता देण्यासाठी पोलिसांची या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी भाजपच्या सावेडी उपमंडल कार्यालयाने केली आहे.

प्रभाग सुरक्षा योजना राबवा

ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ग्रामसुरक्षा दल योजना राबवली जाते. त्याच धतवर शहरात देखील वॉर्ड किंवा प्रभाग सुरक्षा योजना राबविण्यात येणार होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक कार्यालयातून शहरातील चाचपणी देखील झाली होती. परंतु पोलीस अधीक्षकांच्या जशा बदल्या होत गेल्या, तशी ही योजना बस्तानात गेली. या योजनेचा पुन्हा विचार होऊन प्रभाग सुरक्षा रक्षक नेमावेत, याकडेही भाजपने लक्ष वेधले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)