राणूबाईंच्या इतिहासाचा उलगडा करा

भारतीय रक्षक आघाडीची मागणी

सातारा – भुईज, ता. वाई येथे असलेली समाधी ही राणूबाई यांचीच असल्याचे पुरावे मिळत नसले तरी इतिहासातील राणूबाईच्या नोंदीच्या आधारे ही समाधी राणूबाई यांचीच असल्याचे समोर येत आहे. ग्रामपंचायतीने त्याबाबत पुरावे सादर करून त्यांच्या खऱ्या इतिहासाचा उलगडा करावा, अन्यथा दि. 18 रोजी भारतीय रक्षक आघाडीतील कार्यकर्ते कृष्णा नदीत आंदोलन करतील, असा इशारा भारतीय रक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरबाज शेख यांनी पत्रकार परिषदेत दिला.

-Ads-

शेख म्हणाले, भुईज येथे राणूबाई यांची समाधी असल्याचे समजते, मात्र त्याच जागेवर एकाने इमारत उभारली आहे. या जागेचा 8/अ उताऱ्यावर रजिस्टर क्र.878 च्या समोर घुमटाचा चतुबरा भुईज ग्रामपंचायत नोंद आहे. यावरुन या ठिकाणी चबुतरा होता, याला पुष्टी मिळते.

याच चबुतऱ्यावर एक तुळशी वृदावन होते. या समाधीच्या ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी अगर दर्शन घेण्यासाठी फक्त जाधवराव घराण्यातील महिलांना जाण्यासाठी भुयारी मार्ग जाधवराव यांच्या वाड्यात होता. समाधीच्या दगडावरील शिल्पाचा अभ्यास केल्यास या ठिकाणी राणूबाई यांची समाधी असल्याचे संकेत मिळत आहेत, असे शेख यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)