राणी लक्ष्मीबाई संस्थेतून महिलांना मदतीचा हात

येरवडा – शिकाल तर बहराल, शिकाल तरच सुकाळ या आशयाचे फलक व आरास करून येथील विद्यार्थीनींनी गणेशोत्सव साजरा करीत आहेत. गणपती हे विद्या व कलांची देवता असून स्वतःच्या कुटुंबाच्या व समाजाच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व रोजगार हे अत्यंत आवश्‍यक असून तेच ब्रीद मानून संस्था 2004 पासून कार्यरत आहे. राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने शास्त्रीनगर येथे शासनाचे विविध प्रशिक्षण वर्ग मोफत व अल्पदरात चालविले जातात. या भागातील विशेषतः महिला व युवकांसाठी प्रशिक्षण देण्याचा व त्यांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन मानस आहे.

संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष ऍड. संगिता देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कविता सोनवणे, स्मिता लोंढे, किर्ती सूर्यवंशी, सुरेखा वटारे, सुरेखा कळमकर, पूजा चव्हाण, सुवर्णा घोंगटे, मीनाक्षी काशीद या सर्व प्रशिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून गणेशोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विधायक असा गणेशोत्सव साजरा करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या आवारात गेली 12 वर्षे सातत्याने गणेशोत्सव हा उत्साहात साजरा केला जातो. संस्थेचे संचालक, शिक्षक व विद्यार्थी हे यामध्ये सहभागी असतात. या ठिकाणी महापालिकेच्या विविध प्रशिक्षणांसह कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाची प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे मोफत व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थीनी गणेशोत्सवासाठी सजावट, पूजेची तयारी व प्रसाद स्वतःच तयार करतात. दहा दिवस कुकींग वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक व प्रसाद शिकवून तोच बाप्पाला नैवद्य म्हणून अर्पण केला जातो. तर आरतीसाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थीनी तसेच प्रशिक्षकाला संधी दिली जातो.

या ठिकाणी संगणकाच्या विविध कोर्सेससह ब्युटीपार्लर, कुकींग-केटरींग, फॅशन डिझायनींग, एम्ब्रॉयडरी, लेदर पर्स मेकींग सह विविध पंचवीसहून अधिक प्रकारच्या व्यवसाय मार्गदर्शन कोर्सेस चालविले जातात. शासनमान्य प्रमाणपत्रासह प्रशिक्षणपूर्ण लाभार्थ्यांना नोकरीची सुध्दा संधी मिळते. सध्या सुमारे 700 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून आजवर सुमारे 15 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यशस्वी अनेक उद्योजकांनी स्वयंरोजगाराच्या माधमातून स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)