जकार्ता – गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेला आशियाई स्पर्धांच्या खेळांचा थरार संपला. आज आशियाई स्पर्धांचा शेवट होणार असून स्पर्धेच्या समारोपा प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय संघाची ध्वजधारक होण्याचा मान भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालला दिला गेला आहे अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रायांनी दिली आहे.

राणी रामपालने भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करताना स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करुन दिली आहे.18 व्या आशियाई स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्यात नीरज चोप्रा भारताचा ध्वजधारक म्हणून दिसला होता. भारतीय ऑलिम्पिक संघाचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनीच त्याच्या निवडीची घोषणा केली होती.  याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत हा मान पीव्ही सिंधूला मिळाला होता.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)