राणंदमध्ये शॉर्टसर्किटमुळे साडेतीन एकर ऊस जळाला

राणंद ः वसंतराव जयसिंग शिंदे यांच्या शेतातील जळालेला ऊस.

 

दहिवडी, दि. 9 (वार्ताहर)- राणंद येथील (शेवरी) हद्दीमधील असणाऱ्या टकले वस्तीवरील डी.पी मध्ये झालेल्या स्पार्किंगमुळे वसंतराव जयसिंग शिंदे यांचा साडे तीन एकर ऊस जळून खाक झाला.
याबद्दल अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दीड वाजता टकले वस्तीवरील डी.पी मध्ये अचानक आवाज होऊन आग लागली. त्यामुळे त्याठिकाणी असणारे वाळलेले गवत पेटले व त्यामुळे जवळपास असणाऱ्या शेतातील उसाच्या पाचटीने पेट घेतला. त्यामुळे त्याठिकाणी असणाऱ्या तीन ते साडे तीन एकर उसाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तत्परतेने त्या ठिकाणी आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याबाजूला असलेल्या काही शेतकऱ्यांचा ऊस देखील त्यामुळे बचावला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तलाठी म्हणतात, पंचनाम्याचं उद्या बघू
आग लागल्यानंतर काही वेळातच पोलिस, तलाठी आदी प्रशासनाला माहिती देवूनही घटनास्थळी कोणीच फिरकले नाही. घटनेचा पंचनामा करून त्याची माहिती देऊन संबंधित कारखान्याला उसाची तोड करून घेण्यासाठी मदत करणे गरजेचे होते. मात्र, तलाठी यांनी मी उद्या येतो, मग बघू असे उत्तर दिले व महावितरण विभागाचे कर्मचारी मोबाईलवर व्हिडिओ काढून निघून गेले. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)