राडा तर होणारच…?

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या ‘खडतर’ दौऱ्यावर आहे. (ऑस्ट्रेलियाचा दौरा खडतर म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे.) या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे खांदे फलंदाज चेंडू छेडछाड प्रकरणामुळे खेळणार नाहीत. त्यांनी मोठा ‘राडा’ केला आहे. असे शब्द वापरतोय कारण नुकतीच मी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौऱ्याची प्रमोशनल जाहिरात पहिली आहे. भारतीय क्रिकेटच्या प्रसरणाचे हक्क असलेल्या स्टार स्पोर्टसने ही जाहिरात बनवली आहे.

सध्या जाहिराती आपल्यात किती भिनल्या आहेत जर हे तपासून पाहायचे असेल तर कोणत्याही तरुणाला विचारा ‘क्‍या चल राहा है, त्याचे उत्तर फॉग चल राहा है असेच येईल.’ त्याचप्रकारे स्टार स्पोर्टसने बनवलेल्या अनेक जाहिराती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरल्या आहेत. त्यात भारत – पाकिस्तान सामन्यासाठीची ‘मौका – मौका’ किंवा बांगलादेश मालिकेसाठी ‘बच्चा अब बडा हुआ है’ या जाहिराती या सामन्यांकडे प्रेक्षक खेचून आणण्यात यशस्वी ठरल्या आहेत. भारत – ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी बनविलेल्या जाहिरातीमध्ये गल्ली ते दिल्ली येथे क्रिकेट खेळताना कसे सीन होतात, हे दाखवले आहे. कुठे बवाल, धक्काबुक्की, प्रेक्षकांना शिवीगाळ तर कुठे खेळ भावनेला बाजूला ठेऊन खुन्नसमध्ये बॉल मारणे हे सर्व दाखवले आहे.

क्रिकेट खेळाला ‘सज्जनाचा खेळ’ म्हणून ओळखले जाते. राग या मानवी भावनेचे उत्तम चित्रण केले असल्याने अश्‍याप्रकाच्या जाहिराती पाहिल्यानंतर येणारी पिढी असाच आक्रमकपणा दाखवण्यात कोणतीच कसूर सोडणार नाही. चित्रपटाच्या अगोदर येणारी चेतावणी, शक्तिमान आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जसे जे कोणी लहान आणि सांगतात की आम्ही जे स्टंट करतो ते घरी करू नका, तसे लहान आणि किशोरवयीन मुलांना सांगण्याची वेळ येऊ नये. मैदानावरील त्यांच्या आक्रमकतेला वेळीच लगाम लागावा.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटच्या जगातील दोन महासत्ता आहेत. या दोन संघातील सामने कट्टर प्रतिस्पर्धी संघापेक्षा जास्त आवडीने पहिले जाऊ लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा खेळ हा समोरच्या संघावर कोणतीही दयामाया न दाखवता चारी मुंड्या चीत करणे असाच असतो. समोरच्या खेळाडूंशी बाचाबाची करणे, त्याची एकाग्रता भंग करून चुका करण्यास भाग पडणे हे त्यांच्या खेळ संस्कृतीत भिनले आहे. विजयासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळेच चेंडू छेडछाडीसारखी प्रकरणे होऊन त्यांच्या खेळाची आणि परिणामी देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळली आहे. जर भारतात असे होऊ द्यायचे नसेल तर सज्जनांचा खेळ सज्जनांसारखा खेळण्याची शिकवण आपण दिली पाहिजे.

– राजकुमार ढगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)