राठोडांची वारी शिवसेनेसाठी फलदायी! ; एकनाथ शिंदे यांच्याकडे सूत्रे

भाजपबरोबरअंतिम क्षणी बोलणी होण्याची शक्‍यता

नगर: शिवसेनेला महापौरपदासाठी पांडुरंग पावरणार, असा विश्‍वास स्थानिक नेते करून लागले आहे. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक थंडीच्या वातावरण चांगलीच तापू लागले आहे. ही निवडणूक 28 डिसेंबरला होत आहे. अर्ज विक्री सुरू झाली आहे. कॉंग्रेसने उपमहापौरपदासाठी अर्ज नेला आहे. राष्ट्रवादीने देखील दोन्ही पदांसाठी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष प्रदेशच्या नेत्यांकडे लागले आहे. यातच शिवसेनेकडून महापौरपदाचे सर्व सूत्र सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडे दिली आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे सध्या जड असल्याचे दिसू लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर व उपमहापौरपदासाठी 28 डिसेंबरला मतदान होत आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे महापौरपदाच्या तयारी आहेत. भाजपकडून बाबासाहेब वाकळे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून भाजपला सत्ता घेण्याची “ऑफर’ आहे. भाजपची कोंडी करून, राष्ट्रवादीने महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक लढविणार अशी भूमिका घेतली आहे. आमदार संग्राम जगताप हे त्यासाठी रणनीती आखत आहेत. कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या नगरसेवकांची स्वतंत्र बैठक घेतली आहे. लोणी येथे रविवारी बैठक होते नाही, तोच कॉंग्रेसच्या उमेदवार शीला चव्हाण यांनी उपमहापौरपदाचे दोन अर्ज नेले आहेत. शीला चव्हाण, या कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीप चव्हाण यांच्या पत्नी आहेत. कॉंग्रेसने हे अर्ज नेऊन निवडणूक अधिकच रंगतदार स्थितीत आणून ठेवली आहे. कोण कोणाबरोबर याचे गणित बांधणे स्थानिक राजकीय विश्‍लेषकांना देखील अवघड जाऊ लागले आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूर येथे आज सभा होती. या सभास्थळी उपनेते अनिल राठोड यांनी धडक मारली. उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांची निवडणुकीच्या अनुषगांने महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पांडुरंगाचे दर्शन घेऊन अनिल राठोड हे सभास्थळी न थांबता पुन्हा नगरला येऊन धडकले आहेत. येताना राठोड यांनी शिवसेनेसाठी खुशखबर आणल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. महापौरपदाची सर्व सूत्रे उद्धवसाहेबांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहेत.

गेल्यावेळीही एकनाथ शिंदे यांनी शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करून शिवसेनेची गेलेली सत्ता खेचून आणली होती आणि सुरेखा कदम यांना महापौरपदी संधी मिळाली होती. शिवसेनेचे परिस्थिती आताही गेल्या पंचवार्षिकसारखीच आहे. सत्तेजवळचे संख्याबळ असून देखील किंगमेकर होता येईना, अशी! आताही तशीच परिस्थिती आहे. गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच संभाळले होते. आताही त्यांच्याकडे सूत्रे गेल्याने शिवसेनेचा उत्साह वाढला आहे. पांडुरंग पावणार आहे, अशीच चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)