‘राझी’ची कोटींच्या कोटी उड्डाणे

आलिया भट्टच्या अभिनयाने नटलेला ‘राझी’ चित्रपट दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच बाराव्या दिवशी देखील कोटींच्या कोटी उड्डाणे घेताना दिसत आहे. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात ५६.५९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, दुसऱ्या मंगळावारी चित्रपटानं ३.३० कोटींचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ८५.३३ कोटींची दमदार कमाई केली आहे.

शुक्रवारी डेडपूल-२ हा हॉलिवूडपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाच्या कमाईवर काहीच परिणाम झाला नाही. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित ‘राझी’ मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला असून, विनीत जैन, करण जोहर, हिरु यश जोहर आणि अपूर्व मेहता हे चित्रपटाचे निर्माते आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)