राज ठाकरे यांना डोकं नाही, ते माझी कॉपी करतात- प्रकाश आंबेडकर

मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे यांना डोकं नाही ते माझी कॉपी करत आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेना आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवली होती.

-Ads-

दरम्यान, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. “मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप मी महिनाभरापूर्वीच केला होता”,असे ते म्हणाले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
168 :thumbsup: Thumbs up
706 :heart: Love
2 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
2 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)