राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती ही मुंबईतील रहेजा कॉलेजमधील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

विष प्राशन करून या शिक्षकाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.  दरम्यान, स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शिक्षकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)