राज ठाकरे यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना

मुंबई : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे. “हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ, क्रांतिवीरांचे सेनापती, विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता ह्या विषयी विचार मांडणारे, प्रखर राष्ट्राभिमानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन,” या शब्दांमध्ये ठाकरे यांनी सावरकरांना मानवंदना दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधारेवरून भारतात राजकीय वाद पराकोटीचे आहेत. भारतीय जनता पार्टीने महात्मा गांधींना आपलेसे केले असले तरी भाजपाचे सावरकर प्रेमही उघड आहे. राहूल गांधींनी सावरकरांवर वेळोवेळी टीका केली असून सावरकरांची विचारधारा आम्हाला कधीच मान्य नव्हती असे म्हटले होते. तसेच गांधी आमचे सावरकर तुमचे असंही गांधींनी भाजपाला उद्देशून म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)