राज ठाकरे – अहमद पटेल यांच्यात बैठक 

महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली 

मुंबई  – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यात अहमद पटेल यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नानिमित्त आलेल्या अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे खासगीत बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे देखील महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या विवाहसोहळ्यासाठी राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिले होते. या विवाहसोहळ्यात कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वतीने अहमद पटेल हे सहभागी झाले होते. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांची खासगीत भेट घेतली. सुमारे 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता मनसेचा महाआघाडीत समावेश करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला दोन ते तीन जागा देण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी आहे. मात्र, कॉंग्रेसच्या सहमतीशिवाय राष्ट्रवादीला हा निर्णय घेता येणार नाही, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. पटेल यांच्या उपस्थितीमुळे राज ठाकरे आणि गांधी कुटुंबात चर्चेसाठी एक दार उघडले आहे, याकडेही विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले मनसे ने इतर पक्षांच्या वळचणीला न लागता एकतर महाराष्ट्राचा विचार करिता स्वतंत्रपणे सर्वच निवडणुका लढवाव्यात कारण आजच्या राजकीय परिस्थितीत लहानात लहान राजकीय पक्षाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यात स्वाभिमान असतो व आजच्या तरुण पिढीत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यातच राज ठाकरे ह्यांचे व्यक्तिमत्व अनेकांचे आकर्षण ठरत आहे जसे शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचे आकर्षण ठरे होते व आजही काही प्रमाणात त्यांच्या विचारांचा आचारांचा प्रभाव पाहावयास मिळतो सत्तेसाठी त्यांनी विचारांशी कधीच तडजोड केली नाही हे त्यातील प्रमुख कारण आहे तसेच महाराष्ट्रात मराठी माणसाचे हित जपणे हाच त्यांचा दृष्टीकोन राहिलेला आहे आज त्यांचे पाणी १००% ठाकरे कुटुंबात कोणाहीमद्धे असणे शक्य नाही व हे स्वाभाविक म्हणावे लागेल तरी पण राजकारण विचारात घेता जर उती करणे आवश्यक असेलच तर शिवसेनेशीच करावी त्यासाठी मुंबई उद्धव ह्याच्या सुपूर्त करावी व पुणे राज ह्यांनी आपल्याकडे घ्यावे असे केल्यास मराठी माणसाचे मत हे इतर पक्षांकडे वळणार नाही व मराठी घरातच ते सुरक्षित राहील तसेच तुमची घरगुती करणे ह्याचा उहापोह जाहीररीत्या होऊ नये ह्याची खबरदारी घेणे हे दोन्ही पक्षासाठी महत्वाचे आहे कारण नागपूरला शिवसेनाप्रमुख सामना ह्या दैनिकाच्या उदघाटन प्रसंगी आले असता त्यांनी तेथील एका जेष्ठ साधूची भेट घेतली असता त्या ऋषींनी बाळासाहेबांच्या गळ्यात विषारी साप टाकला होता ह्याचे फोटो सुद्धा वृत्त पत्रातून प्रसिद्ध झाल्यानेच इतरांना कळले ह्या मागील मुख्य हेतू घरातील भांडणे कुरबुरी हे बिलातच राहू ध्या त्याचे तोंड उघडल्यास ह्या बिळातून बाहेर पडणारे जहाल मराठी कोब्रा रुपी सापाची पिलावळ ढाण्या वाघाला सुद्धा नेस्तनाबुउत करेल आजच्या घडीला त्यांचे हे भाकीत पुष्कळ प्रमाणात खरे होत असल्याचे पाहावयास मिळत नाही का ? ठाकरे कुटुंबांनी मराठी मनासाठी व माणसासाठी आता हे लक्षात घेणे हि काळाची गरज ठरते असे म्म्हणटल्यास चूक ठरेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)