राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट करावी – माणिकराव ठाकरे

कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई – भाजप विरोधातील राजकीय आघाडीत महाराष्ट्र नव निर्माण सेना दाखल होऊ इच्छित असेल तर त्यांनी आपली राजकीय भूमिका आणि पक्षीय धोरण स्पष्ट करावे असे आवाहन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी मोदी मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे आवाहन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की बारा वर्षापुर्वी राज ठाकरे यांनी स्वत:चा वेगळा राजकीय पक्ष काढताना आपली निश्‍चीत अशी राजकीय भूमिका किंवा धोरण स्पष्ट केलेले नाहीत. त्यांना राष्ट्रीय धोरणाने राजकारण करायचे आहे की आपल्या प्रादेशिक अजेंड्यावरच आपली भूमिका कायम ठेवायची आहे हे त्यांनी स्पष्ट करावे. महाराष्ट्रातील परप्रांतीयाच्या स्थलांतराविषयीची भूमिकाही त्यांनी स्पष्ट करणे गरजेच आहे. त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली तरच त्यांना भाजप विरोधातील आघाडीत सहभागी होणे सोपे होईल असे ते म्हणाले.

शरद पवार आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्‍यता सध्या वर्तवली जात आहे त्या विषयी विचारले असता त्यावर माणिकराव ठाकरे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रीया दिली नाही. याविषयी शरद पवार हेच सांगू शकतील असे ते म्हणाले. भाजपच्या विरोधात रिपब्लीकन पक्षाच्या सर्व घटकांनीही एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)