राज ठाकरेंचे मोदी-गडकरी-फडणवीस यांच्यावर टीकास्त्र 

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिवाळीनिमित्त राज ठाकरेंनी व्यंगचित्राची मालिका सुरु केली आहे. याच मालिकेत लक्ष्मीपूजन दिनानिमित्ताने आणखी एक व्यंगचित्र काढत नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

काय आहे व्यंगचित्र 
लक्ष्मीपूजन असे या व्यंगचित्राला मथळा दिला आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसमोर लक्ष्मी उभी आहे. आणि ती म्हणते कि, बाबांनो, गेल्या साडेचार वर्षात तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो लाखो कोटींमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले!

दरम्यान, याआधीही राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपवर टीकास्त्र सोडले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)