राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा 

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एका वृत्तवाहिनीला दीर्घ मुलाखत देऊन आपले मौन सोडले. तब्बल ९० मिनिटांच्या या मुलाखतीत मोदी यांनी राममंदिर, पाकिस्तान, कॉंग्रेसमुक्‍त भारत, नोटाबंदी, जीएसटी, काळा पैसा यासह सर्व विषयांना स्पर्श केला. या मुलाखतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा साधला. मोदींची मुलाखत म्हणजे स्वतःनीच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखे होते, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

काय आहे राज ठाकरेंचे व्यंगचित्र 
व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोदींनाच बसलेले दाखवले असून यावेळी बोला काय विचारू? असे विचारत आहे. एक मनमोकळी मुलाखत असे शीर्षक या व्यंगचित्राला दिले आहे. तसेच राज ठाकरे यांनी मुलाखतीचे सर्व वातावरण मोदीमय दाखवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)