अमित शहा म्हणजे नरकासुर : राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा 

मुंबई – दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राची मालिका आणली आहे. आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी भाजपला व्यंगचित्रातून लक्ष्य केले. अभ्यंग स्नान आणि नरक चतुर्दशी आशा मथळ्याखाली दोन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहा हे भाजपला पडलेले दिवाळी स्वप्न असून अमित शहा म्हणजे नरकासुर अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

काय आहेत व्यंगचित्र 
आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. याचाच संदर्भ घेत राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या व्यंगचित्रात देवेंद्र फडणवीस परंपरेप्रमाणे अंगाला तेल लावून घेत आहेत. याचवेळी एक कार्यकर्ता येऊन त्यांच्या कानात येऊन सांगत आहे कि, साहेब… अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय पाठवू का? या चित्रात मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर गर्दी जमलेली दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाची सुरुवात आंघोळ केल्यानंतर कारेटे नावाचे काटेरी फळ पायाखाली चिरडले जाते. यानुसार व्यंगचित्रात कारेटे फळ म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. भाजप पक्ष झोपलेला असून अमित शहारुपी फळाला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)