राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्याचे दादरच्या उड्डाणपुलावर चढून आंदोलन

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता जीवावर उदार झाला आहे. श्याम गायकवाड असे या कार्यकर्त्याचे नाव असून तो शिवसैनिक आहे. श्याम गायकवाड रविवारी दुपारच्या सुमारास दादरमधील खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाच्या मनोऱ्यावर चढला. याठिकाणी उभे राहून त्याने राज व उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

सध्या या उड्डाणपुलाचे काम सुरु असून श्याम पुलाच्या मनोऱ्यावर उभा आहे.  या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान याठिकाणी दाखल झाले आहेत. या सर्वांकडून श्यामला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या गोंधळामुळे सध्या या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)