राज्य स्तरीय थाय बॉक्‍सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला अजिंक्‍यपद

पिंपरी-सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्य स्तरीय थाय बॉक्‍सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने अजिंक्‍यपद पटकावले. 27 सुवर्ण, सात रौप्य आणि 15 ब्रांझ पदकांची संघाने कमाई केली. अहमदनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाय बॉक्‍सिंग स्पर्धेकरिता या खेळाडूंची निवड झाली आहे.

शिवराम गावडे, अमिन अत्तार, ऋतुज भागवत, श्रवण विसे, आफताब शिकलगार, हेमल शाह, जान्हवी वर्मा, अर्श शिकलगार, अजित जैस्वार यांनी चांगली कामगीरी केली. स्पर्धेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून 400 खेळाडू सहभागी झाले होते. शहर संघटनेचे कार्याध्यक्ष जमीर शिलगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले. आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, हाजी दस्तगीर मणियार यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)