राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती

मुंबई: राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यांच्यासह अन्य 35 नव्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी राहील.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा कालावधी 5 ऑगस्ट 2018 रोजी संपुष्टात आला होता. परंतु, नव्याने पुनर्रचना होईपर्यंत विद्यमान समितीस मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर आज ही नवीन समिती जाहिर करण्यात आली. डॉ. सदानंद मोरे हे यापूर्वी पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या सारथी समितीच्या अध्यक्ष पदीही ते विराजमान होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सदस्यपदी कलावंत गिरीष प्रभूणे, चित्रपट समिक्षक अशोक राणे, लेखक अरूण शेवते, भारत ससाणे, डॉ मार्तंड कुलकर्णी, सुनीलकुमार लवटे, संगीतकार संदीप खरे, आसाराम कसबे, ज्योतीराम कदम, उत्तम बंडू तुपे, रेणू पाचपोर, आशुतोष अडोणी, रवींद्र गोळे, सिसिलीया काव्छहालो, उमा कुलकर्णी, सुप्रिया अय्यर, डॉ, विद्या पाटील, फरझाना डांगे, उषा परब, राणी दुर्वे, सुधीर पाठक, ए.के.शेख, विजय पाडळकर, जगन्नाथ शिंदे, अशोक सोनावणे, डॉ.रणधीर शिंदे, लखनसिंग कटारे, पत्रकार अरूण करमकर, शंकर धडके, संजय ढोले, देवीदास पोटे, रमेश पवार, डॉ.उत्तम रूद्रावतार, डॉ. मधुकर वाकोडे यांच्यासह 35 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)