राज्य सरकार विरोधात काळ्या गुढ्या

निमसाखर- नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी सरकारवर निष्ठुरतेचा आरोप करीत उद्या गाव बंद करून घराघरावर तसेच रस्त्याकडेने ठिकठिकाणी काळी गुढी उभी करून राज्य शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. नदीला पाणी येत नाही तोपर्यंत दररोज एक गाव बंद ठेवण्यात येणार असून पाणी येईपर्यंत काळ्या गुढ्या उभ्याच ठेवल्या जाणार आहेत. निरवांगी व दगडवाडी ही गावे सुरवातीला बंद ठेवली जाणार आहेत.
नीरा नदीमध्ये पाणी सोडावे, या मागणीसाठी निरवांगी, निमसाखर व खोरोची यासह परिसरातील वाड्यावस्त्यांवरील शेतकरी मुंबईमध्ये विविध नेत्यांना भेटले. नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक नसल्याचे बैठकीसाठी गेलेल्या प्रतिनिधींनी सांगितले. यामुळे या मागणीकरिता उपोषणाच हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. नीरा नदीच्या कोरड्या पात्रात आजही हे उपोषण सुरु आहे.
नीरा नदीवर असलेल्या धरण साखळीमध्ये 64 टक्के साठा असुन कॉंग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये धरणात याच्यापेक्षा कमी पाणीसाठा असताना देखील नीरा नदीत पाणी सोडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची जाण नसलेले मंत्रीपदावर, सत्तेवर आहेत. यामुळे अंदाजे 79 किलोमिटर अंतर कोरडे ठाक असुन कमीत कमी फाऊंडेशन लेवलपर्यंत तरी पाणी दिले जावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
या उपोषण आंदोलनात 21 शेतकरी सहभागी झाले अूसन यामध्ये 60 ते 75 वर्षाचे सुमारे सहा ग्रामस्थ तर ह्दयशस्त्रक्रिया झालेल्या एका शेतकऱ्याचाही समावेश आहे. उपोषणकर्त्यांचे वजन एक ते दिड किलोने घटले आहे. रक्तदाबही कमी-जास्त होत आहे. निरवांगी प्राथमिक उपकेंद्रातील डॉ.प्रशांत महाजन यांचे पथक उपोषणकर्त्यांची तपासणी करीत आहे.
दरम्यानच्या काळामध्ये सोलापुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने- पाटील, सोलापूर जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माळशिरस पं.समिती सदस्य पाडुरंग देशमुख, जिल्हा बकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, निरा भिमा कारखान्याचे संचालक रणजित रणवरे, छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे, इंदापूर पंचायत समिती माजी सभापती दत्तात्रय शेंडे, यशवंत सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे, आदिनाथ बोराटे – पाटील, माजी सरपंच राजु भाळे यांच्याह अन्य मान्यवरांनी भेटी देऊन अंदोलनासाठी पाठींबा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)