राज्य राखीव पोलीस दलाची जवानांची कामगिरी उत्कृष्ट

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचे दौंड येथे प्रतिपादन

दौंड- राज्य राखीव पोलिस दलाची जवानांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचे सर्टिफिकेट केंद्र सरकारने दिले असल्याची माहिती पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच व सात येथील विविध विकास कामाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना महासंचालक पडसलगीकर म्हणाले की, राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांची काळजी जर सरकारने घेतली तर जवान त्याचे काम उत्कृष्टरीत्या पार पाडतील. लोकसभा निवडणुकीत लागणाऱ्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाची मागणी जास्त होत आहे. यावरून आमच्या जवानांचे काम उत्कृष्ट असल्याचे सर्टिफिकेटच एक प्रकारे केंद्र सरकारने दिले आहे. जिल्हा नियोजन समितीमधून राज्य राखीव पोलीस दलासाठी कधीच निधी उपलब्ध झाला नाही. मात्र, आमदार राहुल कुल यांनी हा निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्यांचे विशेष आभार मी मानतो असे पडसलगीकर म्हणाले.
राज्य राखीव पोलीस दलाला बंदोबस्ताचा सगळ्यात जास्त ताण असतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ते जवान त्यांची कामगिरी व्यवस्थितरीत्या पार पाडत आहेत, याचा चांगला अनुभवही आला आहे. यावेळी राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी म्हणाल्या की, राज्य राखीव पोलीस दलाची गौरवशाली परंपरा आहे त्यामुळे जवानांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य राखीव पोलिस दलाचे गट पाच चे समादेशक तानाजी चिखले यांनी केले तर आभार गट सात चे समादेशक श्रीकांत पाठक यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य राखीव पोलीस बल गट हे माझ्या मतदारसंघात येतात. मात्र, येथील सुविधांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नव्हता म्हणून महाराष्ट्राच्या अंदाजपत्रक समितीला विनंती करून येथील निवासस्थानी बघण्यासाठी घेऊन आलो, त्यावेळी त्यांच्याही लक्षात आले की जवान किती दयनीय अवस्थेतराहतात. त्यानंतर विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा करून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच व सात, तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथील विविध विकासांतर्गत कामांसाठी 85 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात यश आले. राज्य राखीव पोलिस दलाची भूमिका नेहमीच सहकार्याची असते. मागील तीन वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दलाच्या आवारात मी भरवत असलेल्या महाआरोग्य शिबिरात येथील जागा उपलब्ध करून दिली जात आहे त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे.
-राहुल कुल, आमदार

महाराष्ट्राची ओळख राज्य राखीव पोलीस दलाने

महाराष्ट्राची ओळख मला राज्य राखीव पोलीस दलाने झाली आहे. मी आसाममध्ये राहत असताना पहिली किंवा दुसरीत शिकत असताना तेथे बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले होत, त्यावेळी मला पोलीस दल आणि महाराष्ट्राची ओळख झाली होती अशी आठवणही दत्ता पडसलगीकर यांनी यावेळी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)