राज्य मिनी फुटबॉल स्पर्धा आजपासून

पुणे: पुणे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे कॉलेजच्या मैदानावर राज्यस्तरीय मिनी फुटबॉल स्पर्धेचे 8 व 9 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील 20 जिल्हयांतून 400 पेक्षा अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मिनी फुटबॉल असोसिएशनचे सचिव तकदीर सय्यद यांनी दिली.

स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी महसूल अधिकारी बजरंग मेकाले, माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे, नगरसेवक अविनाश बागवे, हाजी गफूर पठाण, महाराष्ट्र मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इक्रम खान, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष इम्तियाज पीरजादे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते ताहेर आसी आदी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत 12, 14 व 17 वर्षाखालील मुले आणि 19 वर्षाखालील मुली सहभागी होणार असून मुंबई शहर, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, परभणी, लातूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पिंपरी-चिंचवड, पालघर, सोलापूर आदी जिल्हयांतून संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा समारोप 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)