राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद- पो. नि. गोकुळ औताडे

संगमनेर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट वाटपाचा घेतलेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असल्याचे गौरवौद्गार संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, संगमनेर शाखेच्या वतीने व संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या हेल्मेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष सोमनाथ काळे, सचिव संजय गोपाळे, शाम तिवारी, नितीन ओझा, विकास वाव्हळ, वसंत बंदावणे, बाबासाहेब कडू, गोरक्ष मदने, संजय साबळे, राजू नरवडे, भारत पडवळ, शेखर पानसरे, आनंदा जोंधळे, स्वानंद चत्तर, गोरक्ष नेहे, दिलीप पवार आदी पत्रकार उपस्थित होते. .

पोलिस निरीक्षक औताडे म्हणाले की, संगमनेर शहरात नोकरी करत असताना सर्वच क्षेत्रातील लोकांबरोबर पत्रकारांचेही चांगले पाठबळ मिळत आहे. त्यामुळे सर्वांचे काम चांगले आहे. जातीय सलोखा कायम टिकून राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आता येथून पुढच्या काळातही अशाच पद्धतीने जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी सर्व पत्रकारांचे सहकार्य अपेक्षित आहे. लवकरच या संदर्भात मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सोमनाथ काळे, भारत पडवळ, संजय गोपाळे, वसंत बंदावणे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेतलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. सर्व पत्रकारांना पो.नि. औताडे यांच्या हस्ते हेल्मेट, डायरी, पेन, बॅग आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)