चिखली – महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चिखली येथील चंद्रभागा गोशाळेचा विशेष सन्मान करण्यात आला.

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने औंध येथे आयोजित केलेल्या पशुपालक मेळाव्यात गोशाळेच्या वतीने संचालक रामकृष्ण लांडगे यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पशुसंवर्धन विभागाचे मुख्य आयुक्त कांतीलाल उमाप, माजी संवर्धन आयुक्त विश्वास भोसले, माजी आमदार शरद ढमाले आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून देशी गायींचे संवर्धन केले जात आहे. चंद्रभागा गोशाळेच्या माध्यमातून गोसंवर्धन तसेच ग्रामीण भागात पशुसंवर्धनाचे काम चालते. गोशाळेत कपिला या दुर्मिळ देशी गायींचे पालन केले जात आहे. गायीचा उपयोग याबाबत जनजागृती केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)