राज्य परिवहन महामंडळात नोव्हेंबरमध्ये विविध पदांची भरती – आ. पिचड

अकोले – राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आदिवासी चालक, वाहक व अन्य रिक्‍त पदांची नोव्हेंबरमध्ये भरती केली जाणार असून अकोले येथे आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार असल्याची माहिती अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आ. वैभवराव पिचड यांनी दिली.
आ.पिचड व समिती प्रमुख प्रा.अशोक उईके यांनी नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यालयाला भेट देवून आढावा घेतला. राज्य परिवहन महामंडळात होणाऱ्या चालक, वाहक व इतर अन्य रिक्त पदांच्याबाबत व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना विचारणा केली होती. आदिवासी समाजातील बेरोजगारी हटविण्यासाठी ही रिक्त पदे कधी भरणार आहात? असा सवाल करुन त्यांना निरुतर केले होते. त्यावर महामंडळाचे महाव्यवस्थापक माधवराव काळे यांनी आ.पिचड यांना पत्र पाठवून आदिवासी बहुल जिल्ह्यातील युवकांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्याचे व मंडळाच्या सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय पालघर, शहादा आणि अकोले या ठिकाणी आदिवासी चालक प्रशिक्षण केंद्रे सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)