राज्य खो-खो स्पर्धेत पुण्याच्या संघ अव्वल

मंचर- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव तालुका स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याच्या मुलांच्या संघाने तर मुलींमध्ये ठाणे संघाने प्रW‘ क्रमांक पटकावला.
अंतिम सामना मुलांच्या गटात पुणे आणि नाशिक यांच्यात झाला. द्वितीय क्रमांक नाशिक, तृतीय क्रमांक सांगली, चतुर्थ क्रमांक मुबंई जिल्ह्याला मिळाला. उत्कृष्ठ खेळाडू पुरस्कारने दिलीप खांडवे यांचा सन्मान करण्यात आला. आक्रमक खेळाडू संदेश जाधव, संरक्षक खेळाडूचे पदक राहुल मंडल यांना मिळाले. मुलांच्या गटातील अंतिम सामना पुणे आणि ठाणे यांच्यामध्ये झाला. त्यामध्ये ठाण्याचा संघ विजयी झाला. द्वितीय क्रमांक पुणे, तृतीय क्रमांक सांगली, चतुर्थ क्रमांक अहमदनगर जिल्ह्याच्या संघाला मिळाला. उत्कृष्ठ खेळाडू आश्‍विनी मोरे, आक्रमक खेळाडू स्नेहल जाधव, संरक्षक खेळाडूचे पदक रेश्‍मा राठोड यांना मिळाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मोरडे फूड्‌सचे हर्षल मोरडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील, शिरुर लोकसभा युवकचे अध्यक्ष सचिन भोर समवेत विविध संस्थांचे पदाधिकारी व विविध राज्यातील खेळाडू उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)