“राज्य उत्पादन’कडून 17 लाखांचा दारूसाठा जप्त

संग्रहित छायाचित्र......

सात भरारी पथकांकडून नववर्षाच्या पूर्वरात्रीवर लक्ष

नगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात नववर्षाच्या प्रारंभ अगोदरच 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा विनापरवाना व बेकायदेशीर दारूसाठी जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात सात भरारी पथकांची स्थापना करून, अवैध व बेकायदेशीर दारू विक्रीवर लक्ष ठेवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठयाप्रमाणात पार्ट्यांचा आयोजन केले आहे. त्यात अवैध व बेकायदेशीर दारूचा वापर होतो. त्यावर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्य उत्पादनचे विभागीय उपआयुक्त अ. ना. ओहोळ, अधीक्षक पराग नलवकर उपअधीक्षक सी. पी. निकम यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाभर कारवाई सुरू आहे. राज्य उत्पादनच्या पथकाने नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, संगमनेर या तालुक्‍यांमध्ये कारवाई करत 30 डिसेंबरला 11 ठिकाणी छापे घातले.

या छाप्यांमध्ये 11 आरोपींना अटक केली असून त्यांचेकडून बेकायदेशीर देशी, विदेशी, ताडी व गावठीदारूचा एकूण 17 लाख 60 हजार किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. गोवा बनावटीचे महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले मद्ये, त्याची बुचे व लेबल्सचा, 5 दुचाकी, 2 चाराचाकीचा समावेश आहे.
राज्य उत्पादनचे निरीक्षक संजय सराफ, विभागाचे निरीक्षक ए. बी. बनकर, भरारी पथाचे निरीक्षक अनिल पाटील, संगमनेर निरीक्षक एस. डी. परदेशी यांच्यासह कर्मचारी सहभआगी झाले होते.

काष्टीत साडेचार लाखांची दारू लंपास

श्रीगोंदा – तालुक्‍यातील काष्टी येथील हॉटेल रवीराजमधून रविवारी( दि.30) रात्री सुमारे साडेचार लाखांची निरनिराळ्या प्रकारची दारू लंपास करण्याची घटना घडली. याबाबत हॉटेल मालक रवींद्र भीमराव पाचपुते यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. काष्टी येथे वाघजाई चौकात रवीराज हॉटेल आहे. पाचपुते यांचा पुतण्या सोमवारी (दि.31) सकाळी साडेआठ वाजता दुकान उघडण्यासाठी गेला असता दुकानाचा दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरांनी रविवारी रात्री दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. हॉटेलमधील तेराशे रुपये रोख आणि निरनिराळ्या प्रकारच्या दारूच्या बाटल्या असा एकूण 4 लाख 49 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)