राज्य उत्पादनकडून 13 दुकानांचे परवाने रद्द

नगर – महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि विनापरवाना दुकाने उघडे ठेवणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कार्यवाही केली, असून जिल्ह्यातील 13 दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्‍त जगेश्‍वर सहारीया यांनी अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिल्यावर जिल्हयातील राज्य उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील हॉटेल स्वप्नील (कायनेटीक चौक), राजासाब वाईन्स (स्टेशन रोड), अनिता वाईन्स (लालटाकी), हॉटेल राजधन (सारसनगर), हॉटेल सुरज (नगर-दौंड रोड), हॉटेल नंदनवन (टिळक रोड), हॉटेल संकल्प (सर्जेपुरा), मदहोश वाईन्स (मंगलगेट), मनोहर वाईन्स (नगर), हॉटेल चैतन्य (नागापूर), देशी दारू दुकान (देहेरे, ता. नगर), हॉटेल राजकमल (जामखेड) व हॉटेल किनारा (जामखेड) या हॉटेलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये व कोरडया दिवशी मद्यविक्री करताना आढळून आले आहे. प्रामुख्याने परवाने लवकर म्हणजेच वेळे आधी सुरू करणे, स्टॉक मोजणी नसणे, विना परवाना मद्यविक्री करणे, मोठया प्रमाणात मद्यविक्री करणे व हिशोब वही न ठेवणे याचा प्रामुख्याने समावेश आहे.

-Ads-

जिल्हाधिकारी कार्यालयास या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तीन दिवसांच्या आत समोरच्याना म्हणणे सादर करण्याचे आदेश आहेत. राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक सी. पी. निकम यांनी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे निवडणूक काळात होणाऱ्या अनुचित प्रकारास आळा बसणार आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 ते 29 नोव्हेंबरपर्यंत 122 गुन्हे दाखल करुन 78 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 19 लाख 62 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 6 चारचाकी व 10 दुचाकींचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)