राज्यावर पाऊस अजूनही रुसलेलाच

 

पुणे, दि.10 -पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हे क्षेत्र जर सक्रिय झाले, तर पुढील आठवड्यापासून मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात मात्र त्याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही. विदर्भ वगळता अन्य भागात कमी पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. एकंदरीत ऑगस्टमध्ये राज्यात पावसाचा जोर कमीच राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्‍यता आहे. पावसाने ओढ दिल्याने सध्या राज्यात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा, विदर्भातील विस्तृत भागावर पाऊस न झाल्याने पिकांची परिस्थिती गंभीर आहे. हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यात पश्‍चिम बंगाल ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या परिसरात पुढील आठवड्यात बहुतेक दिवस पाऊस होण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम राजस्थान, गुजरात, मराठवाडा, तेलगंणा, रायलसिंमा,तामिळनाडू, यापरिसरात बहुतेक िंठकाणी हलका पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

हवामान विभागाने जुलैमध्ये 100 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात मॉडेलमधील त्रुटी ही 9 टक्के गृहीत धरली जाते. त्यानुसार 94 टक्के पाऊस झाला आहे. मध्य भारतात व राज्यात जुलै अखेर चांगला पाऊस झाला होता आता उत्तर भारतात पाऊस होत असून मध्य भारत व राज्यात पाऊसमान कमी झाले आहे. संपूर्ण देशभरात एकाच वेळी मान्सूनचा पाऊस होत नाही, हे त्याचे वैशिष्ट आहे.

मागील दोन दिवसापुर्वी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतू हा कमी दाबाचा पट्टा वेगाने राजस्थानकडे सरकल्याने राज्यात पाऊस होऊ शकला नाही. आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून राज्यात विशेषत; विदर्भात पाऊस पडण्याची शक्‍यता आहे,एकदरीत संपुर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात पाऊस कमी राहू शकतो त्यामुळे परिस्थिती गंभीर बनण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)