राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा विरोधकांचा कांगावा -चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : विरोधकांकडून राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा कांगावा केला जात आहे. पण राज्य सरकारला 25 टक्क्यांपर्यत कर्ज घेता येते. युती सरकारने 16 टक्के कर्ज घेतले आहे. मुद्रांक शुल्कातून या आर्थिक वर्षांत 25 हजार कोटी महसुलाचे उद्दिष्ट ओलांडले आहे. यातून राज्य सरकारमध्ये कर्ज घेण्याच्या क्षमतेसोबतच महसुली उत्पन्न वाढवण्याचीही क्षमता असल्याचे सिद्ध झाले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवल्यास विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात रविवारी सकाळी ग्रंथालय, व्याख्यान कक्ष, परीक्षा हॉल, उपहारगृह, पॅथालॉजी, मायक्रोबॉयालॉजी व्याख्यान कक्ष इमारतींचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पुर्वी टेंडरपुर्वीच नारळ फुटायचे, आता टेंडर निघाल्यानंतरच नारळ फोडले जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटने होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आज भुमिपूजन झालेली विकासकामे निश्चितच पूर्ण होतील. त्याला निधी दिला जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. कोल्हापूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यासाठी आयडीयल मॉडेल बनावे, यासाठी प्रयत्न करू, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यायामशाळेचा, बस, रूग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)