राज्यात 9 टक्के दूषित पाणी – बबनराव लोणीकर

नागपूर – राज्यातील पाण्याचे जैविक तपासणीमध्ये जवळपास 9 टक्के दूषित प्रमाण आढळून आले असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.

आमदार राहुल कुल यांनी पाण्यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना लोणीकर यांनी ही माहिती दिली. राज्यात एप्रिल महिन्यात 53 हजार 512 पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये जवळपास 4 हजार 606 नमुन्यातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. याचे प्रमाण केवळ 9 टक्के आहे. त्यामुळे ज्या स्रोतातून दूषित पाणी येते, ते स्रोत बंद करून पर्यायी स्रोतातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

याशिवाय दूषित पाण्यातून होणाऱ्या विषमज्वर, पटकी, कावीळ आणि अतिसार यांसारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलजन्य आजारांचे नियमित सर्वेक्षण, औषधी पुरवठा, पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांचे नियमित प्रशिक्षण, ग्रामविकास व पाणीपुरवठा विभागाच्या समन्वययाने स्वच्छता सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, जलशुद्धीकरण यंत्रणांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण पातळीवर नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्याप्रमाणे “आरओ’ बसविता येईल काय? याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. तसा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)